बाळे (सोलापूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा
बाळे (जिल्हा सोलापूर) : एखादी मुलगी लव्ह जिहादला बळी पडल्यास माझ्या धर्मातील एक स्त्री अल्प झाली, याची खंत आपल्याला वाटत नाही. जातींमध्ये आपण विखुरले गेलो आहोत. हिंदु सिंह आहेत, हे कधीही विसरता कामा नये, तरच भारत तेरे टुकडे होंगे, इंशाह अल्लाह या घोषणा दिल्या जाणार नाहीत. आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवूया, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या.
या वेळी २०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी धर्माचरणाचे महत्त्व आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यासाठी कृतीशील होणे आवश्यक या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.
विशेष
सभेचे आयोजन, प्रसार आणि सिद्धता या सर्व कृती येथील श्री. रणधीर स्वामी आणि त्यांचे सहकारी यांनी उत्स्फूर्तपणे केल्या.
नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !
सौ. राजश्री तिवारी यांनी नववर्ष १ जानेवारीला साजरे करणार की, गुढीपाडव्याला ?, असा प्रश्न विचारल्यावर सर्वांनी मोठ्या आवाजात गुढीपाडव्यालाच साजरे करणार, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात