फलटण (जिल्हा सातारा) : येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २३ डिसेंबर या दिवशी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी राणी पद्मावतीचा अवमान करणार्या पद्मावती चित्रपटावर बंदी घाला, भारतीय सैनिकांवर दगडफेक करणार्या काश्मिरी युवकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेऊ नयेत, तसेच फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, या मागण्या करण्यात आल्या.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुधा घाटगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सर्वश्री आशिष कापसे, अभिजीत कापसे, सुहास काशिद, संदीप काशिद, अभिजीत ओझर्डे, सौ. शैलजा देशपांडे, सौ. चारुशिला क्षीरसागर यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.
विशेष
आंदोलनस्थळी एक गाय आणि वासरू रांगेत २०-२५ मिनिटे उभे होते. ही गाय एका पायाने अधू होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Very good and informative article.
Also, the idea of beef being protein source for poor lacks substance and needs to be squashed.