व्हिएन्ना : संयुक्त राष्ट्रसंघाने आण्विक शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त करत; हा धोका टाळण्याकरता जगभरातील देशांनी त्वरा करत यासंदर्भात एक करार करावा, असे आवाहन केले आहे.
आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेचे अध्यक्ष युकिया अमानो यांनी अशा स्वरुपाचा करार करण्याआधी आण्विक साहित्य संरक्षण कायद्यामधील दुरुस्तीचे पालन करण्याचे आश्वासन आणखी ११ देशांनी देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या करारामुळे दहशतवाद्यांच्या हाती संवेदनशील आण्विक साहित्य जाण्याची शक्यता कमी होईल, असे अमानो म्हणाले. याचबरोबर, या करारामुळे आण्विक प्रकल्पांवर हल्ला होण्याची शक्यताही कमी होईल, असे मानले जात आहे.
अमानो यांनी यासंदर्भात बोलताना १९९५ पासून किरणोत्सर्गी साहित्य “हरविल्याच्या‘ जवळजवळ २८०० घटनांची माहिती संस्थेकडे नोंदविण्यात आल्याचे सांगितले.
संदर्भ : सकाळ