Menu Close

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यासाठी धर्मप्रेमी सिद्ध !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे हिंदु धर्मजागृती सभा

अंबाजोगाई (जिल्हा बीड) : येथे २४ डिसेंबर या दिवशी येथील योगेश्‍वरी मंदिर सभागृहात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण संघटित होऊन तन, मन, धन अर्पण करून सुराज्य अभियानात सहभागी होऊया, असे आवाहन केले. सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला. या वेळी अंबाजोगाईसह आसपासच्या ग्रामीण भागातील २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. सुनिता पंचाक्षरी यांनी शौर्यजागरण याविषयी मार्गदर्शन केले. सभा यशस्वी होण्यासाठी सर्वश्री राजकुमार गायके, बालाजी भारजकर, आकाश चौरे, अशोक गुरव, दिनेश उपरे, अनिल समुद्रे, बालाजी सुरवसे, राजेश जाधव, गजानन गुजर आदींनी परिश्रम घेतले.

आभार !

१. योगेश्‍वरी मंदिर संस्थानचे श्री. भगवानराव शिंदे यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.
२. अमृतेश्‍वर डेकोरेटरचे मालक श्री. नंदकिशोर सातपुते यांनी बैठक व्यवस्था केली.
३. श्री. सतीश केंद्रे यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा  आणि श्री. मुन्ना सोमाणी यांनी जनरेटरची व्यवस्था केली.
५. श्री. पंकज लखेरा यांनी चहापानाची व्यवस्था केली.
६. मुंबई येथील (स्टँडर्ड बुकमार्ट) चे श्री. महेश स्वामी यांनी सभागृहातील १ दिवस पुस्तक प्रदर्शन बंद ठेवले.

क्षणचित्रे

१. सभेसाठी मुरुड येथून आलेले धर्मप्रेमी श्री. दिनेश ढेकने हे सभा झाल्यावर स्वयंस्फूर्तीने सभागृह आवरण्याच्या सेवेत सहभागी झाले.
२. येथील पिंपळा धायगुडा येथील धर्मप्रेमींनी सभेच्या प्रसारानिमित्त गावात बैठकीचे आयोजन केले होते, त्यानंतर धर्मप्रेमींनी प्रत्येक शनिवारी सामूहिक आरती करण्यास प्रारंभ केला.
३. २५ कि.मी. अंतरावरून सभेसाठी ७ जण आले होते.
४. सभेनंतर २ धर्मशिक्षणवर्ग आणि २ प्रवचने यांची मागणी उपस्थितांनी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *