हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याचा शासनाकडे आग्रह धरा !
कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणार्या प्रसादाचे लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या विचाराधीन आहे. (देवीच्या भक्तांनी प्रसाद बनवायला हवा, हेही न समजणारे प्रशासन आणि देवस्थान समिती ! भक्त ज्या भावाने प्रसाद बनवणार, त्या भावाने कैदी महिला कधीतरी प्रसाद बनवतील का ? आणि अशा प्रसादाचा भाविकांना लाभ कसा होणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी याविषयी कारागृह अधिकार्यांशी चर्चा केली आहे.
कळंबा कारागृहात ५० महिला कैदी आहेत. शिक्षेच्या काळात त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी डॉ. सैनी यांनी पुढाकार घेतला आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात प्रसादासाठी प्रतिदिन तीन सहस्रांहून अधिक लाडू आवश्यक असतात. सणांच्या दिवशी आणि नवरात्रात ही संख्या दहा सहस्रांवर जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात