काश्मिरी हिंदूंच्या ‘होमलॅण्ड डे’ दिनानिमित्त कल्याण येथे हिंदु धर्मजागृती सभा
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर महाराजांनी आरमार निर्माण केले. त्याच कल्याण शहरात आज मिनी पाकिस्तान निर्माण होत आहे का, अशी भीती व्यक्त केली जाते. या भीतीमागील कारण म्हणजे आपल्याला महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला गेला नाही. गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अभाव आणि लादली गेलेली मेकॉले शिक्षणपद्धत यांमुळे आपण राष्ट्र अन् धर्म यांपासून दूर गेलो. सध्या धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणामुळे हिंदूंचे संघटन वाढते. श्रीकृष्णाने पांडवांचे संघटन करून धर्माधिष्ठित राज्याची स्थापना केली. पांडवांप्रमाणेच हिंदूंचे संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. समितीच्या कार्याविषयी आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी सांगितले. काश्मिरी हिंदूंच्या ‘होमलॅण्ड डे’ दिनानिमित्त कल्याण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा लाभ १८० धर्मभिमान्यांनी घेतला. कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी २ जानेवारीला सायं.७.३० वाजता अयोध्या निवास येथे बैठक ठरवण्यात आली आहे.
क्षणचित्रे
१. काही लोक घरातील आगाशीमध्ये येऊन सभा ऐकत होते.
२. सभेची सिद्धता स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी केली.
३. लव्ह जिहादचा विषय मांडल्यावर स्त्रियांनी लव्ह जिहाद कल्याणमध्येही होत असल्याचे सांगून सहमती दर्शवली. (हे पोलीस आणि सरकार यांना ठाऊक नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. १ धर्मशिक्षणवर्ग आणि ३ हिंदु धर्मजागृती सभा यांची मागणी आली.
५. दुर्गा मित्र मंडळ, विघ्नहर्ता सार्वजनिक मित्र मंडळ, जय बळीराजा मित्र मंडळ आणि बजरंग बली मित्र मंडळ यांनी सभेला सहकार्य केले.
६. सहकार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ : सर्वश्री नितेश नागोठणेकर, प्रतीक धनवे, हेमंत पाटील, राजेश शेलार, दीप ठाकूर, किशोर शिर्के, ओंकार चव्हाण, सिद्धेश गिरीधर, अरविंद गुप्ता आणि भरत परांजपे
७. श्री. राजेंद्र पाटील यांनी सभेला लागणार्या आसंद्या, पटल आणि प्रकाश योजना विनामूल्य उपलब्ध करून दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात