Menu Close

रामराज्यातील आनंद प्राप्त करून देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प करूया ! – राहुल कदम, हिंदु जनजागृती समिती

आळसंद (विटा) येथे हिंदु धर्मजागृती सभा

आळसंद (विटा) (जिल्हा सांगली) : स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भारतियांवर लादलेली धर्मनिरपेक्ष लोकशाही फसवी आहे. या धर्मनिरपेक्षतेमुळे हिंदूंना कोणताही लाभ झालेला नाही. संख्येने प्रबळ असलेल्या १०० कोटी हिंदूंचे एकही ‘हिंदु राष्ट्र’ पृथ्वीवर अस्तित्वात नाही. त्यामुळेच रामराज्यातील आनंद प्राप्त करून देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कदम यांनी केले. येथे ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात ‘हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सभेला प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य दादा महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिभा तावरे यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता विशद केली.

क्षणचित्रे

१. सभेपूर्वी अर्धा घंटा आधीपासून ८ ते १० लहान मुले सभास्थळी स्वयंस्फूर्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत होती.

२. सभेला युवक आणि महिला यांची लक्षणीय उपस्थिती होती.

३. आळसंद येथील शिवगर्जना शिवजयंती आणि दुर्गामाता उत्सव मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी सभा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *