Menu Close

कल्याण येथे विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

गुन्हेगारीत अग्रसेर असणारे धर्मांध !

कल्याण : येथे नव्याने चालू करण्यात आलेल्या बिसमिल्ला भट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने ४९ विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे प्रवेश शुल्क घेऊन फसवणूक केली आहे. या प्रकरणी संस्थाचालक अज्जीमुद्दीन बिसमिल्ला शेख, महमंद इजाजउद्दीन जमालउद्दीन रहेमानी, महंमद कलीम महमंद याकूब शेख या धर्मांधांच्या विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून कल्याण न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मान्यता नसतांना खोटी कागदपत्रे दाखवून हे महाविद्यालय चालू करण्यात आले होते.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे धर्मांध चोराला अटक

कल्याण : चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या सलमान सय्यद या धर्मांधाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे कह्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. येथील वालधुनी परिसरात एक महिला घरी एकटी असल्याचे पाहून सलमान त्याच्या सहकार्‍यासह घरात घुसला. या वेळी महिलेने आरडाओरड केल्यानंतर धर्मांधाने धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी त्याला पकडले, तर त्याचा सहकारी पळून गेला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *