Menu Close

कोल्हापूर येथे पाकिस्तानच्या ध्वजाची शिवसेनेकडून होळी !

पाकने कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांचा अवमान केल्याचे प्रकरण

कोल्हापूर : कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानने अवमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ ३० डिसेंबरला येथील शिवाजी चौक येथे शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या, तसेच खोट्या बातम्या प्रसिद्ध करणार्‍या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचा निषेध केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार म्हणाले की, कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानने अत्यंत अवमानकारक वागणूक दिली; मात्र हा केवळ कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाचा अवमान नसून समस्त भारतियांचा अवमान आहे. त्यामुळे सरकारने जाधव यांच्या सुटकेसाठी ठोस पावले उचलावीत. या वेळी शहरप्रमुख श्री. दुर्गेश लिंग्रज, रिया पाटील, शिवसैनिक सर्वश्री अनिल चव्हाण, रणजीत आयरेकर आदी उपस्थित होते. (कुलभूषण जाधव यांच्या अवमानाच्या प्रकरणी केवळ शिवसेना आंदोलन करते. इतर पक्ष याविषयी का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *