भाग्यनगर : नाल्लागोंडा जिल्ह्यातील ऐतुपामुला येथे २९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूऐक्याचा निर्धार धर्माभिमानी हिंदूंनी केला. ऐतुपामुला गावातील काही युवक नाकिरेकल गावात नुकत्याच पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी झाले होते. या सभेतून प्रेरणा घेऊन या युवकांनी ऐतुपामुला गावात या हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या सभेला १२० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. सभेच्या पूर्वी गावातील युवकांनी संपूर्ण गावात वाहनफेरी काढली होती. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सभेत बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आपले लक्ष्य असले पाहिजे. हिंदु राष्ट्रात सर्व समस्यांचे निराकरण होऊन आपण शांतीमय जीवन जगू शकणार आहोत’, असे श्री. चेतन जनार्दन यांनी सांगितले. या वेळी रणरागिणीच्या सौ. विनुथा शेट्टी यांनी ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आणि शौर्यजागरणाची आवश्यकता’, यांविषयी मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. हिंदु धर्मजागृती सभेत ९० टक्के युवकांची उपस्थिती होती.
२. सभेच्या दिवशी पोलिसांनी युवकांना चौकशीच्या नावाखाली त्रास देण्याचा प्रयत्न केला; मात्र युवकांनी मोठ्या आत्मविश्वासाने प्रसंग हाताळला. (हिंदूंनो, तुम्हाला नाहक त्रास देणार्या पोलिसांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करा आणि त्याची माहिती सनातन प्रभातलाही कळवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात