देववाणी संस्कृतला मृतभाषा ठरवून तिची जाणीवपूर्वक पायमल्ली करणार्या काँग्रेसी मंत्र्यांना उर्दूप्रेमाचे भरते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सोलापूर : गझल, शायरी यांसह विविध प्रकारचे साहित्य उर्दू भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात उर्दूप्रेमी आणि अभ्यासक यांची संख्या मोठी आहे, हे लक्षात येते. युवा पिढीला प्रोत्साहन देणारे साहित्य या संमेलनात पहाता आले. त्यामुळे ‘उर्दू’ ही भारत आणि महाराष्ट्राची भाषा आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. (अरबांची असलेली उर्दू हिंदूबहुल भारताची भाषा कधी झाली ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथील पानगल हायस्कूल मैदानात गत ९ दिवसांपासून चालू असलेल्या राष्ट्रीय उर्दू ग्रंथ प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, ‘‘६० लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले जाते, यावरूनच सोलापूरकरांचे उर्दू साहित्याप्रतीचे प्रेम दिसून येते. या भाषेचा विकास आणि विस्तार तालुकास्तरावर व्हावा.’’ (महाराष्ट्रात मराठी भाषेची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी शिंदे यांनी कधी काही केले आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
(म्हणे) ‘केंद्र सरकार उर्दू भाषेसाठी काही करत नाही !’ – उर्दू भाषा विकास परिषद साहाय्यक संचालक कमल सिंग
उर्दू भाषेची १२९१ अभ्यासकेंद्रे (स्टडी सेंटर) आहेत. या व्यतिरिक्त केंद्र सरकार उर्दू भाषेप्रती काही करत नाही. (उर्दू शिक्षणासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते ! उर्दू साहित्यासाठी सरकारी निधी दिला जातोच ! असे असूनही असंतुष्ट असणार्या धर्मांधांचा सरकारला घरचा अहेर ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments