- कधी मशीद किंवा चर्च येथे हिंदूंची नेमणूक केल्याचे ऐकले आहे का ? हिंदूंनो, तुमच्या मंदिरांचा बाजार करून ठेवणार्या मंदिरांच्या सरकारीकरणाला कडाडून विरोध करा आणि तेथील सर्व ख्रिस्त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करा !
- आज तिरुपती मंदिरात ख्रिस्त्यांची नेमणूक करणार्या सरकारने उद्या मंदिराच्या परिसरात चर्च बांधल्यास आश्चर्य वाटणार नाही. असे होऊ द्यायचे नसेल, तर आता तरी हिंदु राष्ट्र (ईश्वरी राज्य) स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
आंध्रप्रदेश : हिंदूंच्या जगप्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिरात ४२ ख्रिस्ती कर्मचारी काम करत असून त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार केला जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने आंध्रप्रदेश सरकारकडे तक्रार केली असून ‘या लोकांचे काय करायचे’, असा प्रश्न विचारला आहे. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी मंदिराच्या उपकार्यकारी अधिकारी स्नेहलता या देवस्थानच्या वाहनाचा वापर चर्चमध्ये जाण्यासाठी करत असल्याचे एका चित्रफितीतून उघड झाले होते. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. तिरुमला हे हिंदूंसाठी पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र असून तेथे अन्य धर्मियांना त्यांच्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्यास बंदी आहे.
आंध्रप्रदेश सरकारनेही वर्ष २००७ मध्ये ‘तिरुपती मंदिरात केवळ हिंदु कर्मचार्यांचीच निवड करावी’, असा स्पष्ट आदेश ‘तिरुमला तिरुपती देवस्थान’ला दिला आहे. हा आदेश देण्यापूर्वी ३५ ख्रिस्ती कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र आदेशाच्या नंतरही म्हणजे वर्ष २००७ नंतर ‘तिरुमला तिरुपती देवस्थान’ने ७ कर्मचार्यांची नेमणूक केली. (आदेश झुगारणार्यांची सरकारने तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे हिंदूंना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) आता त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार होत असल्याचा आरोप होऊ लागल्यावर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. काही अयोग्य आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचा विधी विभागाने मंदिर परिसरात इंग्रजी नवीन वर्ष साजरे करण्यासही मनाई केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात