नौनी (जबलपूर) : तरुणांनी पाश्चात्त्य कुप्रथांपासून दूर रहावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राज्यस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथे नुकताच युवकांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. श्री. जाखोटीया पुढे म्हणाले, ‘‘युवकांनी पाश्चात्त्य कुप्रथांचे अंधानुकरण स्वत: करू नये, तसेच इतरांचेही त्याविषयी प्रबोधन करावे. याशिवाय प्रत्येक युवकाने धर्माचरण करणेही आवश्यक आहे.’’ या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्याचे समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी उपस्थित युवकांना ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महत्त्व’ याविषयावर मार्गदर्शन केले. या बैठकीस १७ युवक उपस्थित होते. रा.स्व. संघाचे श्री. नीतीन पटेल आणि श्री. दिलीप पाठक यांनी हे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
कामती पिठहरा (हौशंगाबाद, मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रदर्शनाद्वारे जनजागृती
कामती पिठहरा (हौशंगाबाद) : येथील माजी आमदार साधना स्थापक यांनी नुकताच प.पू. नित्यानंद महाराज यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. ५ दिवस चालणार्या या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण देणारे फलक लावून जनजागृती करण्यात आली. प्रवचनाला येणारा प्रत्येक जण हे प्रदर्शन जिज्ञासेने पहात होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात