Menu Close

पाकमधील बलात्कारपीडित हिंदु महिलेला पोलीस संरक्षण देण्याचा पाक न्यायालयाचा आदेश

  • कुठे अन्यपंथियांसाठी पोषक भूमी बनलेला हिंदुबहुल भारत, तर कुठे अल्पसंख्य हिंदूंसाठी नरकभूमी बनलेली इस्लामी राष्ट्रे !
  • जगभरातील हिंदु बांधवांच्या रक्षणार्थ समस्त हिंदूंनी आता हिंदु राष्ट्र (ईश्‍वरी राज्य) स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद : येथील एक बलात्कारपीडित हिंदु महिला आणि तिचे कुटुंबीय यांना पोलीस संरक्षण देण्याचा आदेश सिंध उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. पाकमधील एका प्रभावशाली परिवारातील एका व्यक्तीने एका हिंदु महिलेवर बलात्कार केला. यानंतर सिंध उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अहमद अली एम्. शेख यांनी स्वत: या घटनेची नोंद घेत वरील आदेश दिला. याशिवाय न्यायाधिशांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असून बलात्कार्‍यावर कारवाई करण्याचा आदेशही दिला आहे. (पाकमधील हिंदुद्वेषी व्यवस्था पहाता, तेथे हिंदूंना न्याय मिळणे केवळ अशक्य आहे. यासाठी भारत सरकार त्यांच्यावर दबाव आणणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) न्यायालयीन देखरेखीखाली हे अन्वेषण होणार आहे.

सदर पीडित हिंदु महिला ही तेथील एका गरीब शेतकर्‍याची मुलगी आहे. घटनेनंतर तिची वैद्यकीय पडताळणी झाली असून त्यात तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेनंतर त्या भागातील पोलीस अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

यापूर्वी पाकच्या मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतात प्रत्येक मासाला अनुमाने २० ते २५ हिंदु मुलींवर बलात्कार करून त्यांचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *