अखिल भारत हिंदु महासभेची पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंची प्राचीन मंदिरेही अवैध ठरवून पाडणारे प्रशासन धर्मांधांची थडगी हटवण्यास कुचराई का करते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सोलापूर : येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील शहाजीरअली दर्ग्यासमोरील दुभाजकावर असलेले अतिक्रमित थडगे हटवावे, या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदु महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना नुकतेच देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
१. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील अनेक धार्मिक स्थळे हटवण्यात आली; परंतु सिद्धेश्वर मंदिराजवळील दुभाजकामध्ये असलेले अतिक्रमित थडगे तसेच आहे. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
२. या थडग्यासमोर सिद्धेश्वर प्रशाला असल्याने शाळा भरतांना आणि सुटतांना वाहतुकीची कोंडी होते.
३. सदर यात्रेत होणार्या गर्दीला यामुळे अडथळा निर्माण होतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात