मुंबई : पौष मासानिमित्त चुनाभट्टी परिसरातील टाटा नगर येथील संत माऊली मंदिर आणि कांजूरमार्ग येथील महापौर मैदान या ठिकाणी नुकतेच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होतेे. या सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. लक्ष्मण जठार यांनी धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती विशद करतांना लव्ह जिहाद, सरकारच्या कह्यात असलेल्या मंदिरांतील घोटाळे, चित्रपटांतून हिदूंंच्या धर्मस्थानांवर होणारे आघात, यांविषयी उपस्थितांना अवगत केले. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता असून त्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. चुनाभट्टी येथे ५० आणि कांजूरमार्ग येथे ८० जिज्ञासूंनी या प्रवचनाचा लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. चुनाभट्टी येथे कामगार संत सेवा मंडळाचे राघुजी दर्पे आणि चुनाभट्टी येथे विश्वास यांनी अल्प कालावधीमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले.
२. चुनाभट्टीतील हिंदू चेतना संघाचे ६ कार्यकर्ते मार्गदर्शनाला उपस्थित होते. ७ जानेवारी २०१८ या दिवशी चुनाभट्टी येथे हिंदू चेतना संघाच्या होणार्या कार्यक्रमाला त्यांनी डॉ. लक्ष्मण जठार यांना सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित केले.
३. कार्यक्रमस्थळी धर्मशिक्षणाचे फ्लेक्स प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात