Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे केरळ राज्यातील वृद्धिंगत होत असलेले धर्मप्रसाराचे कार्य !

१. दत्तजयंतीनिमित्त केलेला प्रसार

केरळ येथील लोकांना दत्तात्रेयाविषयी ठाऊक नाही. येथे दत्तात्रेयाची मंदिरे फारशी नाहीत. येथील लोकांना पूर्वजांचा त्रास आहे. या वर्षी दत्तजयंतीच्या अनुषंगाने केरळ येथील जिज्ञासूंना सोशल मीडिया (व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक), भ्रमणभाष आणि फलकप्रसिद्धी, यांद्वारे दत्तजयंती अन् दत्ताचा नामजप यांचे महत्त्व सांगण्यात आले. साधकांनी जिज्ञासूंना एकत्रित येऊन दत्ताचा सामूहिक नामजप करण्यास सांगितला आणि दत्तजयंतीच्या दिवशी घरी अधिकाधिक नामजप करायला सांगितला. काहींनी सांगितल्यानुसार जप केला आणि त्यांना चांगल्या अनुभूतीही आल्या.

१ अ. जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी केलेले धर्माचरण अन् त्यांना आलेल्या अनुभूती

१ अ १. पाठ दुखत असतांनाही दत्ताला १०८ प्रदक्षिणा घालणे : अधिवक्ता त्रिवेणी यांना पाठदुखीचा त्रास आहे. साधकांनी त्यांना दत्तजयंतीच्या दिवशी दत्ताचा नामजप करण्यास सांगितला. त्यांना दत्तजयंतीचे मल्याळम् भाषेतील व्हिडिओ व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवले होते. त्यांनी जवळच्या दत्त मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना केली, हे देवा, माझी काही क्षमता नाही. तूच माझ्याकडून प्रदक्षिणा करवून घे. त्यांची पाठ दुखत असूनही त्यांनी त्या दिवशी दत्ताला १०८ प्रदक्षिणा घातल्या.

१ अ २. सौ. देवी यांनी दत्तजयंतीच्या दिवशी बसून २० माळा दत्ताचा नामजप केला. आता त्या प्रतिदिन नामजप करतात.

१ अ ३. सौ. प्रेमा यांनी भागवताचा अभ्यास करणार्‍या भाविकांकडून दत्ताचा नामजप करवून घेणे : सौ. प्रेमा भागवताचा अभ्यास करतात. त्या ठिकाणी १० ते १२ जण येतात. सौ. प्रेमा यांनी त्यांना दत्तजयंतीच्या दिवशी दत्त आणि दत्ताचा नामजप यांचे महत्त्व सांगितले अन् त्यांच्याकडून तेथेच ५ मिनिटे नामजप करवून घेतला.

१ अ ४. अनुभूती – सौ. मिनी यांनी स्वतः आणि त्यांच्या रुग्णाईत वडिलांनी दत्ताचा नामजप केल्याने वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होणे : सौ. मिनी राजेश नियमितपणे फलकलेखनाची सेवा करतात. त्यांचे वडील दत्तजयंतीच्या आधी रुग्णाईत होते. त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवले होते. सौ. मिनी यांनी स्वतः आणि त्यांच्या वडिलांनी जप अन् प्रार्थना केली. त्यानंतर वडिलांच्या प्रकृतीत पालट दिसून आला आणि ते घरी आले. दत्तजयंतीच्या दिवशी सौ. मिनी यांनी मनापासून जप केला. त्या दिवशी वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते उठून बसले.

२. प्रवचनाचे आयोजन

९.१२.२०१७ या दिवशी एर्नाकुलम् जिल्ह्यातील कडवंत्रा येथील मट्टलिल भगवती मंदिरात प्रवचन करण्यात आले. या मंदिरात प्रत्येक मासात (महिन्यात) एका विशिष्ट दिवशी अनेक लोक जमतात. कु. अदिती सुखटणकर यांनी उपस्थितांना धर्माचरणाविषयी माहिती सांगितली. देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे लाभ, स्त्रियांनी कुंकू लावण्याचे महत्त्व, १ जानेवारीला हिंदु नववर्षदिन साजरा न करण्याचे कारण, यांविषयी उपस्थितांना अवगत करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ २५ जणांनी घेतला.

– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (डिसेंबर २०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *