Menu Close

निष्ठेने भक्ती कराल, तरच परमेश्‍वर पाठीशी ! – प.पू. श्री. सद्गुरु शांताराम महाराज माऊली

प.पू. श्री सद्गुरु शांताराम महाराज माऊली यांचा सत्कार करतांना समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी (उजवीकडे)

नावडे (पनवेल) : निष्ठेने, अत्यंत तळमळीने, मनोभावे आणि दृढतेने भक्ती कराल, तरच ईश्‍वराच्या जवळ जाऊ शकाल. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यामुळे आपल्याला ईश्‍वरप्राप्तीचा योग्य मार्ग म्हणजे काय ?, हे समजले, भक्ती मार्गाची श्रेष्ठता समजली. या भक्तीतच जीवनाची धन्यता आहे, असे मार्गदर्शन प.पू. श्री सद्गुरु शांताराम महाराज माऊली यांनी केले. श्री सद्गुरु शामदास माऊली दत्त दरबार, श्री दत्तनगर, नावडे येथील त्यांच्या आश्रमात नुकतेच प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उदय धुरी यांनीही हिंदु धर्म,धर्माचरण आणि हिंदु राष्ट्र याविषयी उपस्थितांना अवगत केले.

प.पू. श्री सद्गुरु शांताराम महाराज माऊली पुढे म्हणाले, ‘‘साधनेचे मार्ग निरनिराळे आहेत; मात्र आपण आपल्या प्रकृतीनुसार मार्ग निवडून शेवटपर्यंत निष्ठेने भक्तीने साधनेत रहायला हवा. धर्म वाढवायचा असेल तरी भक्तीच लागते. सदा सर्वकाळ भगवंत आपल्या पाठीशी आहेच; मात्र भक्ती केल्यानेच त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. आपण भक्ती केल्याने देव शक्ती प्रदान करतो, आपला सतत योग्य सांभाळ करतो, याची जाणीव आपल्याला होऊ लागते. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनीही आपल्या जीवनातून भक्ती अणि निष्ठा कशी असावी, हे दाखवून दिले आहे. भक्ती मार्गात असतांना पावलोपावली आपले आचरण शुद्ध असावे, निर्व्यसनी, शुद्ध आहार, सत्यवचनीपणा हे गुण अंगी आणावे. केवळ बाहेरून भगवी वस्त्रे नको, तर आतूनही आपण त्याग साधून भगवेमय राहिलो, तरच आपली आध्यात्मिक प्रगती होईल. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या क्षत्रियधर्मानुसार अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलायला लावले आणि हाच स्वधर्म आहे.’’

सनातनच्या ग्रंथांचे कौतुक !

‘प्रवचनाच्या शेवटी महाराजांनी उपस्थित भक्तांना सनातनची विविध देवतांविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथसंपदा पहा आणि आवडीनुसार घ्या,’ असे आवर्जून सांगितले.

साधनेच्या बळावरच हिंदु राष्ट्राची स्थापन होऊ शकते ! – डॉ. उदय धुरी

वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र त्यासाठी आपल्याकड़े साधनेचे बळ हवे. देवतांकडून आपल्याला चैतन्य, आनंद मिळत असतो. आपल्या जीवनात हे चैतन्य कायम रहाण्यासाठी भक्तीमय आचरण करावे. भक्तीमुळे आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. धर्माचरण केल्याने आपल्या अंतरंगात हिंदु राष्ट्र येऊन बाहेरही हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.

अभिप्राय

१. मी स्वत: देवतांचे विडंबन रोखले आहे. समिती आणि संस्था यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा गैरप्रकार थांबवूया. – श्री. ज्ञानदेव म्हसकर

२. राष्ट्र अणि धर्मरक्षण, धर्मजागृति आणि हिंदू संघटन यांत समितीचे कार्य अद्भुत आहे. मी ही माझ्यापरीने यात सहभागी होईन. – श्री. परशुराम माळी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *