ऐरोली (नवी मुंबई) : श्री विठ्ठल रखुमाई वारकरी संप्रदाय आणि एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने ऐरोली सेक्टर १ येथे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी ‘धर्मजागृती’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आज आपल्या परंपरा नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘थरारली वीट’ या नाटकातून आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातून पंढरीच्या वारीचे आणि विठ्ठलाचे विडंबन करण्यात आले आहे. समितीच्या वतीने सनदशीर मार्गाने याला विरोध करण्यात आल्यानंतर हे विडंबन रोखण्यात आले. एम्. एफ्. हुसेन यांनी हिंदु देवताची नग्न चित्रे काढली होती. त्याच्या विरोधात देशभरात तक्रारी नोंद केल्यानंतर त्यांना देश सोडून जावे लागले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर यांचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पहाते. देवस्थान समितीने हिंदूंना पूजनीय असलेल्या गायी कसायांना विकल्या. भक्तांनी अर्पण केलेला पैसा नीट ठेवला नाही. प्रक्षाळपूजेची दिनांक पालटली. या घटना घडू नये, यासाठी मंदिराचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्यावे.’’
९५ जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या सेवेत नव्याने चालू झालेल्या धर्मसत्संगातील धर्मप्रेमी सहभागी झाल होतेे. या वेळी आयोजकांनी पुढील वर्षी प्रवचनासाठी तुम्हाला जास्त वेळ देऊ, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात