Menu Close

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण व्हा ! – मदन सावंत

वंदनगड (जिल्हा सातारा) येथे शिवप्रेमींच्या वतीने दुर्गसंवर्धन अभियान

वंदनगड (तालुका वाई, जिल्हा सातारा) : ‘मंदिरांच्या सरकारीकरणामुळे भक्तांच्या अर्पणाची लूट होत आहे. वन्दे मातरम्ला विरोध करणारे धर्मांध हज यात्रेसाठी अनुदान लाटतात. अशा स्थितीत पुरोगामी अविचारी लोक हिंदूंना दिशाहीन करत आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे. हे लक्षात घेऊन शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण व्हावे,’ असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी केले. ते वंदनगड येथे २५ डिसेंबरला आयोजित दुर्गसंवर्धन अभियानाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

दोन मासांपूर्वी भाऊबीजेच्या दिवशी श्रीशिववंदनेश्‍वर प्रतिष्ठान आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वंदनगड येथे ध्वजारोहण आणि तुळाजी आंग्रे यांच्या समाधीचे पूजन करण्याचा संकल्प केला होता. त्याची या कार्यक्रमात संकल्पपूर्ती करण्यात आली. या अभियानात सर्वश्री अक्षय शिंदे, किरण यादव, संकेत बाबर, हर्षद चव्हाण यांसह किकली, जांब, लिंब, गोवे, लगडवाडी, गोवे दिगर, देऊर, राऊतवाडी, खोलवडी, आंबवडे, बनवडी आणि मुंबई येथून आलेले १५० शिवप्रेमी सहभागी झाले.

किल्ले वंदनगडावर २०० वर्षांनी भगवा ध्वज फडकला !

किल्ले वंदनगडावर २०० वर्षांनी प्रथमच भगव्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. ध्वजाचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. या वेळी केलेला शंखनाद आणि शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त घोषणा यांमुळे वातावरण दुमदुमून गेले होते. शिवप्रेमींनी स्वखर्चाने ध्वजस्तंभ उभा केला.

असे झाले दुर्गसंवर्धन अभियान !

१. सकाळी ८ वाजता किल्ल्यावर स्वच्छता चालू करण्यात आली. त्यानंतर श्री काळुबाईदेवी, प्रवेशद्वारावरील श्री गणेश आणि श्री वंदनेश्‍वर महादेव या देवतांची महापूजा करून सामूहिक आरती करण्यात आली.

२. हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र तुळाजी आंग्रे यांच्या समाधीस्थळाची स्वच्छता करण्यात आली.

३. गडावर श्री वंदनेश्‍वराचे मंदिर उभारण्याचा शिवप्रेमींनी संकल्प केला. या कार्यात सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

क्षणचित्रे

१. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील दळवी यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ दिली. त्यानुसार धर्मसेवेसाठी कार्यरत होण्याचा सर्वांनी निर्धार केला.

२. श्री. मदन सावंत यांच्या मार्गदर्शनानंतर युवकांनी धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. युवकांनी जांब येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची मागणी केली.

३. हिंदु धर्मजागृती सभेचे दैनिक सनातन प्रभात विशेषांक आणि ३१ डिसेंबर साजरा न करण्याविषयीची हस्तपत्रके या वेळी वितरित करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *