श्रीरामपूर : येथे ७ जानेवारीला होणार्या धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी श्रीरामपूर आणि पंचक्रोशीतील गावांतील महिला सिद्ध झाल्या आहेत.
१. बैठकांतून प्रेरणा मिळाल्याने महिलांनी मोठ्या बैठकीचे आयोजन केले. ३१ डिसेंबरचा कार्यक्रम रहित केला. बैठकीसाठी ७ महिलांनी प्रसार केला.
२. वाहनफेरीचे, तसेच सभेला ध्वज आणि फेटे घालून येण्याचे महिलांनी नियोजन केले. सभेनंतरही धर्मकार्य करण्याची सिद्धता दर्शवली.
३. अखिल भारतीय गुजराती समाज महिला मंडळाच्या, तसेच जैन समाजातील प्रतिष्ठित महिलाही बैठका आयोजित करणे, वाहनफेरीत सहभागी होणे यात प्रयत्न करत आहेत.
४. सर्व बैठकांमध्ये महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. महिला सभेला ध्वज घेऊन, तसेच ढोल-ताशांच्या गजरात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
५. बेलापूर या ग्रामीण भागात सभेनिमित्त झालेल्या बैठकीत १३० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही पुढील धर्मकार्यात कृतीशील होण्याची सिद्धता दर्शवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात