हिंदु व्यापार्यांकडून ‘बंद’ची हाक : ‘रस्ता बंद’ आंदोलन
- सतत हिंदुविरोधी वृत्ते दाखवणारी निधर्मी प्रसारमाध्यमे हिंदूंवरील या आघातांविषयी गप्प का ?
- मुसलमानबहुल राष्ट्रात अल्पसंख्य हिंदूंची दुःस्थिती जाणा ! पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंचा पद्धतशीर वंशविच्छेद होत असतांनाही सरकार त्याविरुद्ध एक शब्दही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी दिवसाढवळ्या २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. दिलीप कुमार आणि चंद्र माहेश्वरी अशी त्यांची नावे असून ते भाऊ होते, तसेच व्यवसायाने ते धांन्याचे व्यापारीही होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार आणि चंद्र माहेश्वरी यांनी नेहमीप्रमाणे थारपार्कर या हिंदुबहुल जिल्ह्यातील धांन्य बाजारात त्यांचे दुकान उघडले. त्या वेळी एका दुचाकी वाहनावरून आलेल्या दोघा आक्रमणकर्त्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यास विरोध केल्यानंतर आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
या घटनेच्या निषेधार्थ बाजारातील सर्व हिंदु व्यापार्यांनी ‘बंद’ची हाक देत आपापली दुकाने बंद केली. सर्वांनी एकत्र येत महामार्ग बंद केला, तसेच धरणे आंदोलन केले. सिंध प्रांताचे गृहमंत्री सोहेल अनवर सियाल यांनी उमरकोट येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना हत्येचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला.
धार्मिक स्वातंत्र्याविषयी अमेरिकेने जाहीर केलेल्या ‘आतंरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता अहवाला’त पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदूंची घरे, मंदिरे यांची तोडफोड केली जात असल्याचे म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात