कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांची भोर (जिल्हा पुणे) येथे सहस्रो धारकर्यांच्या समोर सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे कोरेगाव भीमा प्रकरणात नाहकपणे पू. भिडेगुरुजी यांचे नाव गोवण्यात येत आहे. यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून या सर्वामागील सूत्रधाराचा छडा लावावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ५ जानेवारीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हे निवेदन दिले.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. सुरेश यादव, शहरप्रमुख श्री. शरद माळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेना उद्योग समूहाचे श्री. सतीश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधाकर सुतार आणि श्री. मधुकर नाझरे, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये यांसह ५० हिंदुत्वनिष्ठ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात