Menu Close

हिंदूंनी ‘लव्ह जिहाद निषेध पदयात्रे’त लक्षावधींच्या संख्येने सहभागी व्हावे ! – विक्रम पावसकर

 

विक्रम पावसकर

सातारा : हिंदु एकता आंदोलनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० आणि २१ जानेवारी या दिवशी कराड (जिल्हा सातारा) येथून भव्य ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’चे नियोजन केले आहे. यामध्ये समस्त हिंदूंनी लक्षावधींच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु एकता आंदोलन आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केले. शहरातील भाजपचे नगरसेवक श्री. विजयकुमार काटवटे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे २५ हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

या वेळी श्री. पावसकर म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारे हिंदु मुलींना फसवून, फूस लावून त्यांना लव्ह जिहादला बळी पाडले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत याविषयी पोलीस ठाण्यात शेकडो तक्रारी आल्या असून त्यातील अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. याविषयी जागृती होण्यासाठी या पदयात्रेचे नियोजन करण्यात येत आहे. या यात्रेत पीडित युवती आणि त्यांचे पालक आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. या पदयात्रेत प्रत्येक हिंदूने सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावले पाहिजे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *