Menu Close

प्रकाश आंबेडकरांकडून सरकारी मालमत्तेची हानीभरपाई वसूल करा ! – समस्त हिंदू आघाडी

प्रकाश आंबेडकर

पुणे : कोरेगाव भीमा येथील प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या ‘बंद’मुळे सार्वजनिक मालमत्तेची अनुमाने २० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली. ही हानी आंबेडकर आणि त्यांच्या साथीदारांकडून वसूल करण्यात यावी. बंद अवैध असल्याचे ठाऊक असूनही केवळ हिंदुत्वद्वेषापोटी, तसेच स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी हे घृणास्पद कृत्य केले. त्यांच्या चिथावणीमुळे मराठा समाजातील २ निरपराध युवकांचा बळी गेल्याने त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा, तसेच कलम ३०२ च्या अन्वये त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीने केली आहे. या संदर्भातील निवेदन ६ जानेवारी या दिवशी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीनेही वरील मागणीचे निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *