‘निराधार आरोप’, हे पूर्वनियोजित षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप
पुणे : १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही. त्या दिवशी पू. भिडेगुरुजी सांगली येथे गडकोट मोहिमेच्या नियोजनात व्यस्त होते. त्यांच्यावर झालेले आरोप हे पूर्णतः निराधार, तसेच एका पूर्वनियोजित षड्यंत्राचा भाग आहेत. भिडेगुरुजी यांच्याप्रमाणेच श्री. मिलिंद एकबोटे हेही निष्ठेने हिंदुत्व अन् गोरक्षण यांचे कार्य करत आहेत. पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली. ५ जानेवारीला उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना त्याविषयीचे निवेदनही देण्यात आले. धारकरी, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ या वेळी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
खंडाळा (जिल्हा सातारा) येथे पू. भिडेगुरुजींच्या समर्थनार्थ धारकर्यांची फेरी
खंडाळा : शिरवळ आणि खंडाळा (जिल्हा सातारा) येथेही एक सहस्रांहून अधिक धारकरी आणि धर्मप्रेमी यांनी ६ जानेवारीला श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ फेरी काढली. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांच्यावरील आरोपांचा निषेध नोंदवून त्यांच्यावर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी खंडाळ्याच्या तहसीलदारांना निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात