Menu Close

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावरील खोट्या आरोपांची सखोल चौकशी करा !

समाजातील विविध जातींच्या संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी यांची संयुक्त पत्रकार परिषदेत मागणी

सांगली : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या संघटनेत त्यांनी कधीही कुणाला जात विचारली नाही. याउलट हिंदु धर्मातील अठरा पगड जातींना भगव्या झेंड्याखाली एकसंघ बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. गुरुजींचे संपूर्ण समाजासाठी योगदान अतुलनीय असून ते आई-वडिलांपेक्षाही आमच्यासाठी पूजनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाटेवर चालण्याची शिकवण देणार्‍या पू. गुरुजी यांच्यावरील आरोप खोटे आहेत. आरोपांची सखोल चौकशी करावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यामागील सूत्रधाराचा छडा लावावा, अशी मागणी समाजातील विविध जातींचे प्रमुख, पदाधिकारी यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी कळंबी येथील पेशव्यांच्या काळात लढाईत सहभागी झालेले वीर सिद्धनाथ महार यांचे १५ वे वंशज श्री. अभिजित इनामदार यांची विशेष उपस्थिती होती.

पू. भिडेगुरुजी यांच्यावर आरोप करणारे कधीही कळंबी येथे आले नाहीत ! – अभिजित इनामदार

पू. भिडेगुरुजी यांनी मिरज तालुक्यात असलेल्या वीर सिद्धनाथ यांच्या समाधीजवळ काही वर्षांपूर्वी मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन केले होते. गुरुजी येथे नेहमी येतात; मात्र मुंबईत बसून आरोप करणारे एकदाही कळंबी येथे आले नाहीत.

हिंदु धर्मात फूट पाडण्याचे परकीय शक्तींचे कारस्थान – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

गेल्या चार दिवसांपासून चालू असलेला प्रकार म्हणजे हिंदु धर्मात फूट पाडण्याचे परकीय शक्तींचे कारस्थान आहे. फिर्याद देणारे संभ्रमावस्थेत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी ज्या लोकांना खोटी फिर्याद देण्यास भाग पाडले, त्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे !

पाठिंबा दर्शवलेल्या संघटना आणि त्यांचे प्रमुख

मातंग चेतना समाजाचे श्री. अभिमन्यू भोसले, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. अंकुश माने, बुरुड समाजाचे श्री. शशिकांत नागे, वाल्मिकी मेहतर समाजाचे श्री. महेंद्र चंडाळे, वीरशैव माळी समाजाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय माळी आणि संचालक श्री. श्रीकृष्ण माळी, मराठा स्वराज्य संघटनेचे श्री. प्रदीप बर्गे, सांगली जिल्हा भोई समाजाचे श्री. संतोष लोखंडे, अखिल भारतीय ग्वाला समाजाचे श्री. सचिन पवार, परिट समाजाचे श्री. मनोहर साळुंखे, मराठा समाजाचे श्री. धनंजय सूर्यवंशी, बावसार क्षत्रिय समाजाचे श्री. अमित करमुसे, अखिल भारतीय गोसावी समाजाचे श्री. संजय गोसावी, धनगर समाजाचे श्री. विनायक एडके, सिंधी समाजाचे श्री. विजय कामरा, नामदेव शिंपी समाजाचे श्री. मोहन पतंगे, हिंदू कंजारभाट समाजाचे श्री. रोहित नगरकर (मराठा समाजाचे कार्यकर्ते डॉ. कैलास पाटील, कोळी महासंघ, विसावा मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण यांसह अनेकांनी पत्र देऊन, तसेच दूरभाष करून पू. गुरुजींसाठी पाठिंबा दर्शवला.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *