Menu Close

दैनिक सनातन प्रभात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचायला हवे ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

सांगली : हिंदूंचा कैवार घेऊन दैनिक सनातन प्रभात ज्याप्रकारे बाजू मांडते, तसे अन्य कोणीही मांडत नाही. दैनिक सनातन प्रभात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचायला हवे, तसेच दैनिक सनातन प्रभातची आवृत्ती प्रत्येक भाषेत निघायला हवी, असे गौरवोद्गार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी काढले. सनातन संस्थेचे साधक श्री. राजाराम रेपाळ आणि दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी पू. गुरुजींवर होत असलेल्या खोट्या आरोपांच्या संबंधाने भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते.

या प्रकरणी दैनिकाच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला करणे शक्य आहे, ती आम्ही करू, तसेच सनातन संस्थेच्या वतीने साधकांचे जे सहकार्य लागेल, तेही आम्ही करू, असे श्री. राजाराम रेपाळ यांनी पू. गुरुजींना सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *