कोलाड : येथे धर्मप्रेमींच्या सहकार्याने हिंदु धर्मजागृती सभा पार डली. या वेळी ८० धर्मप्रेमी सभेला उपस्थित होते. मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला प्रारंभ झाला. या वेळी आधुनिक वैद्य उदय धुरी आणि सौ. नंदिनी सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
हिंदूंवरील अन्याय, फसवणूक रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – आधुनिक वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती
आज सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागत आहेत. न्यायालय व्यवस्था, वैद्यकीय क्षेत्र यांमध्ये सामान्य जनतेला फसवणूक आणि अन्यायकारक वागणूक मिळत आहे. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.
राष्ट्र आणि सामाजिक स्तरावरील समस्या सुटण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सौ. नंदिनी सुर्वे, सनातन संस्था
हिंदु धर्माचे महत्त्व साधनेत सामावले आहे. यासाठीच सर्वांनी प्रयत्न केल्यासच राष्ट्र आणि सामाजिक स्तरावरील समस्या सुटणार आहेत; म्हणून प्रत्येकाने साधना करायला हवी !
सभेच्या आयोजनात सहकार्य करणारे धर्मप्रेमी !
सर्वश्री प्रवीण शिंदे, दत्तात्रेय घुणे, विजय पाटील, चंद्रकांत लोखंडे, विलास सानप, विकी यादव, अजय लोखंडे, हरिभाऊ मोरे आणि कालिदास डेकोरेटर्स
९ जानेवारीला आढावा बैठक !
स्थळ : शिवनेरी मंगल कार्यालय, मुंबई-गोवा महामार्गालगत, कोलाड
वेळ : सायंकाळी ५.३०
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात