इतिहासाचे विकृतीकरण करणार्या चित्रपटावर भाजपशासित इतर राज्येही बंदी का घालत नाहीत ? कि त्यांना ते मान्य आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जोधपूर : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा २५ जानेवारीला प्रदर्शित होणारा वादग्रस्त ‘पद्मावत’ हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी घोषणा राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी केली. ते म्हणाले, ‘‘राज्यात भाजपचे सरकार लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवू इच्छित नाही. त्यामुळे आम्ही ‘पद्मावत’ हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात