हिंदुसंघटन हाच यावरील उपाय !
जवळा पांचाळ (जिल्हा हिंगोली) : येथे गावकर्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे २२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज कमानीच्या बांधकामाचा शुभारंभ केला. हे काम चालू असतांनाच धर्मांधाच्या टोळक्याने अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंच्या घरावर आक्रमण केले, तसेच घरात घुसून हिंदूंना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. (हिंदूंनो, प्रभावी हिंदूसंघटन किती आवश्यक आहे, हे जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) त्यामुळे जवळा पांचाळ येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
१. जवळा पांचाळ गावाला तंटामुक्त ग्राम समितीच्या स्पर्धेत ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. (हिंदूंवर आक्रमण करणारे धर्मांध असणारे गाव तंटामुक्त कसे ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात) या बक्षिसाच्या रकमेतून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक घ्यावेत, अशी मागणी हिंदूंनी केली; परंतु धर्मांधांनी दर्गापीर नावाची कमान बांधणारच, अशी अडेलतट्टू भूमिका घेतली. (शासनाच्या बक्षिसाचे पैसे स्वतःच्या धर्माचे प्रस्थ वाढवणासाठी वापरणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अशा धर्मांधांमुळे देशाचा विकास कधीतरी होईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
२. हिंदूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन मुसलमानांंसमवेत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत दर्गापीर कमानीसमवेत छत्रपती शिवाजी महाराज कमानही उभारण्यात यावी, असे ठरवण्यात आले.
३. ही बैठक संपताच मुसलमानांनी त्यांच्या कमानीचे काम चालू केले, तर सामंजस्याने ठरलेल्या कमानीच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी हिंदू एकत्र जमले असता हातात लाठ्या-काठ्या घेऊन २०० च्या वर धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण केले. (हिंदू संघटित नसल्यामुळेच त्यांच्यावर वारंवार धर्मांधांकडून मार खाण्याची पाळी येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
४. नारा-ए-तकबीर अशा घोषणा देत धर्मांधांनी प्रचंड धुडगूस घातला. (दर्ग्याची कमान चालते, तर छत्रपती शिवाजी महाराजांची कमान का चालत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
५. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
६. या गावात तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून अमजद खान पठाण, पोलीस पाटील म्हणून मजहरखान पठाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून अजहरखान पठाण हे काम पहातात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात