सातारा : येथील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र चोरगे यांना ४ जानेवारीला वाढदिवसानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी त्यांना ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ हा ग्रंथ आणि ‘सनातन पंचांग २०१८’ भेट देण्यात आले. या वेळी सर्वश्री राहुल भरमगुंडे, अमोल मोरे आणि सुनील दळवी उपस्थित होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला माझा पाठिंबा ! – राजेंद्र चोरगे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र-धर्मविषयीचे कार्य अतिशय चांगले आहे. या कार्याला माझा नेहमी पाठिंबा असेल’, असे ते म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात