Menu Close

संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी इतिहासाची मोडतोड केली ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

कोरेगाव भीमा हिंसाचारामागे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांचा हात

सांगली : संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत करून मांडला. इतिहास बिघडवून सांगणे हेच त्यांचे काम आहे आणि त्यांचाच कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचारामागे हात आहे, असे परखड मत श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मांडले. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

या वेळी पू. भिडेगुरुजी म्हणाले की,

१. काही जणांचा अमृतात माती कालवणे हाच खटाटोप आहे. त्यांच्याकडूनच ही सर्व कामे केली जात आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचा अजिबात हात नाही.

२. प्रकाश आंबेडकर हे कुणीतरी सांगितलेले बोलत आहेत. त्यांचा बोलावता धनी कुणीतरी वेगळाच आहे. संपूर्ण घटनेविषयी त्यांना फार काही माहिती नाही.

३. वर्ष २०१४ च्या निवडणुका झाल्यापासून आतापर्यंत राजकीय पटलावर घडामोडी घडत आहेत. त्यामुळे मराठा मोर्चा, लिंगायत धर्म यांसाठी स्वतंत्र मोर्चा काढणे, यामागे नि:संशय राजकारणी लोक आहेत.

४. ब्राह्मण मुख्यमंत्री आहे; म्हणून विरोधकांना त्रास नाही, तर विरोधकांना हातात सत्ता नसल्याने त्रास होत आहे. त्यामुळे विरोधक सध्या अस्वस्थ आहेत. आपल्याकडे लोकशाही असल्याने ते पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.

५. गेली ७० वर्षे अ‍ॅट्रॉसिटी कायदा आहे. हा कायदा थेट नामशेष करावा, असे माझे म्हणणे नाही; मात्र ‘ट्रायल अ‍ॅण्ड एरर मेथड’ वापरून कायदा रहित करून ३५ वर्षांत पुढे काय होते ते पाहू शकतो. त्याचे चांगले-वाईट परिणाम हे आपल्याला समजतील. यावर लोकसभा आणि राज्यसभा यांमध्ये चर्चा होऊन त्यावर निर्णय घ्यावा. देशात गुणवत्तेवर आधारित आरक्षण दिले गेले पाहिजे. तसे केल्यासच देशाचे कल्याण होईल.

६. वढू येथील गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीविषयी मला विशेष माहिती नाही. मी तिथे केवळ छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेतो.

७. महाराष्ट्राच्या स्थितीत काही फरक नाही. काही लोकांच्या पोटात हिंदु धर्म, हिंदू, हिंदुस्थान यांविषयी आकस आहे. देव, देश, धर्म, राष्ट्र, मातृभूमी हे केंद्रीय मानून कार्य करणारे लोकच सध्याची परिस्थिती पालटू शकतात. तेच नेमके कार्य श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *