नवी देहली : येथील प्रगती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विश्व पुस्तक मेळाव्यात सनातनचे ग्रंथप्रदर्शनही उभारण्यात आले आहे. १४ जानेवारीपर्यंत हा पुस्तक मेळावा आहे. यामध्ये देश-विदेशांतील अनेक संघटना आणि प्रकाशन संस्था सहभागी झाल्या आहेत. या मेळाव्यात सनातनच्या धर्म, अध्यात्म, धर्मशिक्षण, राष्ट्र, आचारधर्म, विकार निर्मूलन, आत्पकालीन चिकित्सा, आयुर्वेद अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा समावेश आहे. हे ग्रंथ इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहेत.
पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचा पत्ता
हिंदी भाषेतील ग्रंथांसाठी : हॉल क्र. १२-१२ए, स्टॉल क्र. ११,१२
इंग्रजी भाषेतील ग्रंथांसाठी : हॉल क्र. ११, स्टॅण्ड क्र. एस् २/८
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात