सातारा : पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात नोंद केलेले खोटे गुन्हे रहित करण्यात यावेत, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री सतीश ओतारी, शुभम शिंदे, प्रतीक कुलकर्णी, अमोल संकपाळ, गणेश भांदिरगे यांसह अनेक धारकरी उपस्थित होते.
प्रेरणा मंत्र म्हणून मोर्च्याला आरंभ !
वडूज : येथे श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालय मोर्चा काढण्यात आला. श्री जोतिबा मंदिरातून प्रेरणा मंत्र म्हणून मोर्च्याला आरंभ झाला. यानंतर प्रांताधिकारी कांबळे, तहसीलदार सुधाकर धाईंजे आणि पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांना निवेदन देण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, वारकरी संघटना, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. या वेळी ह.भ.प. विठ्ठलस्वामी वडगावकर, सर्वश्री अरविंद कांबळे, मंदार जोशी, विनायक ठिगळे आणि अलोकराव महाजन यांच्यासह ६५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
कोरेगाव येथे अनेक धारकरी उपस्थित !
कोरेगाव : येथे नायब तहसीलदार मदने यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धारकरी सर्वश्री महालिंग जंगम, संग्राम साळुंखे, वृशसेन जाधव, श्रेयस काणे आणि आकाश सणस यांसह अनेक धारकरी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
‘पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करणार्यांची चौकशी करा !’
अमरावती येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
अमरावती : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव नाहक गोवले गेले. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणासमवेत काहीच संबंध नाही. श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून देव, देश आणि धर्म यांसाठी युवकांच्या मनामध्ये जागृती अन् भक्ती निर्माण करण्याचे कार्य करते. असे धर्मकार्य करणार्या गुरुजींवर अशा प्रकारचे आरोप केले जातात, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. शासनाने याची वेळीच नोंद घेऊन अशा प्रकारचे गुन्हे प्रविष्ट करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे येथील हिंदुत्वनिष्ठांनी केली. हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेना महिला सहसंपर्क प्रमुख सौ. कांचन ठाकुर, शिवसेना शहरप्रमुख श्री नरेंद्र केवले, हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, श्री. जय देशमुख, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे अमरावती कार्यवाहक श्री. महेश लढके, श्री. अभिषेक दिक्षीत, श्री. चंदन तिवारी यांसह एकूण ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात