Menu Close

विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवीन प्रबोधनात्मक फलक लावला !

बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे यांचा सत्कार !

विशाळगड येथे लावण्यात आलेला नवीन प्रबोधनात्मक फलक

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) : हिंदुत्वाचा राज्यस्तरीय ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्कार’ मिळाल्याविषयी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे यांचा भाजपचे उपसरपंच (येळावे) श्री. सुरेश पटेल आणि हिंदु जनजागृती समितीचे डॉ. संजय गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ३१ डिसेंबरला विशाळगड येथील मुख्य चौकात हा कार्यक्रम पार पडला. तसेच विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडावरील रस्ते आणि गड यांचे पावित्र्य राखण्याविषयी लावण्यात आलेला प्रबोधनात्मक फलक पालटण्यात आला. तेथे ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने नवीन फलक उत्साहात लावण्यात आला.

श्री. संभाजी साळुंखे यांनी हा सत्कार भगवंतेश्‍वराच्या कृपेने मिळाल्याचे सांगितले. डॉ. संजय गांधी यांनी विशाळगडावरील पावित्र्य राखण्याविषयी मार्गदर्शन केले. हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिकेत हिरवे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी पोलीस पाटील श्री. उदय जंगम, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री परेश मिरजकर, सुधाकर मिरजकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री विजय मोरबाळे, जितू पंडित, आबा देशपांडे असे ६० हून अधिक उपस्थित होते.

क्षणचित्र

‘समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रबोधन फलकातून दिशादर्शक माहिती मिळते’, असे पोलिसांनी सांगून समितीचे कौतुक केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *