सनातनच्या आश्रमावर अशाच प्रकारचे आरोप करणारे काँग्रेसवाले आणि सनातनद्वेषी या आरोपावर काही बोलतील का ?
जयपूर : जेएन्यू हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून या ठिकाणी प्रतिदिन वापरलेले ३ सहस्र निरोध मिळतात, असा आरोप राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील रामगडचे भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केला आहे.
आहुजा पुढे म्हणाले की,
१. प्रतिदिन सिगारेटची १० सहस्र थोटके, हाडांचे ५० सहस्र तुकडे, दारूच्या २ सहस्र रिकाम्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात आलेली ५०० इंजेक्शन मिळतात. (आहुजा यांना हे माहीत होते, तर त्यांनी ते आधीच का सांगितले नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
२. जेव्हा देशभर दुर्गाष्टमी साजरी केली जाते, तेव्हा जेएन्यूचे विद्यार्थी महिषासुराची जयंती साजरी करतात. (यावरून या विद्यार्थ्यांची आसुरी वृत्ती लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. जेएन्यूचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नग्न नृत्य करत असतात.
पोलिसांना शरण जाण्याचा देशद्रोही विद्यार्थ्यांना देहली उच्च न्यायालयाचा आदेश !
जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले उमर खालिद आणि अन्य ४ विद्यार्थी यांना उच्च न्यायालयाने पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला आहे. २३ फेब्रुवारीला या विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा आदेश दिला. खालिद याच्या गोपनीय ठिकाणी शरण जाण्याच्या विनंतीवर २४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. सुरक्षेच्या कारणाने खालिद याने ही मागणी केली आहे.
कन्हैया कुमार देशद्रोही घोषणा देणार्यांसमवेत उपस्थित होता ! – देहली पोलीस
कन्हैया कुमार देशद्रोही घोषणा देणार्या विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होता, अशी माहिती देहली पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या चौकशी अहवालात दिली आहे. कन्हैया याच्या जामीनअर्जावरील सुनावणी देहली उच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात