तमिळनाडू : शबरीमालाच्या दर्शनाठी येणार्या भाविकांकडून वसूल करण्यात येणारा पथकर (टोल) रहित करावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एका आंदोलनाद्वारे येथे नुकतीच केली. अखिल भारत हिंदू महासभा या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पुढकाराने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेना, भारत हिंदु मुन्नानी, अखिल भारतीय हनुमान सेना, हिंदु युथ जागृत फोरम, श्रीराम युवा सेना, भारत मुन्नानी, कंदार सेनाई, हिंदु मक्कल कच्छी, हिंदु मारूमालारची मुनेत्र कागझम, हिंदु टेंपल प्रोटेक्शन फोरम्, हिंदु युवा वाहिनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मिळून १५० धर्मामिनी हिंदू उपस्थित होते.
दिव्यांगांना (विकलांगांना) हज यात्रा करता यावी, यासाठी केंद्र सरकारने नुकतेच नियमांत पालट केले ! हज यात्रा सुलभ होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे सरकार हिंदूंच्या यात्रांना मात्र सोयीसुविधा पुरवणे तर सोडाच; पण तिकीट अधिभार, टोल आदींच्या माध्यमांतून दरवाढ करते ! हा भेदभाव कशासाठी ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात