श्री क्षेत्र रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना आणि प्रतापगड ते रायरेश्वर पायी गडकोट मोहीम या पार्श्वभूमीवर भोर येथे जाहीर सभा !
आसेतु हिमाचल कोणताही स्त्री-पुरूष भेद न करता हर एकाच्या अंत:करणात, हृदयात, लहान मोठ्या मेंदूत, डाव्या-उजव्या काळजात, तांबड्या पांढर्या पेशीत आणि रक्ताच्या थेंबाथेंबात शिवाजी-संभाजी हे दोन जगण्या-मरण्याचे मंत्र बिंबवणे हेच राष्ट्रोत्थानाचे कार्य शिवप्रतिष्ठान संघटना करत आहे ! – पू. भिडेगुरुजी
भोर : छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ मावळ्यांमध्ये जागृती करून हिंदूंचे भगवे राज्य निर्माण केले. आज भारताला हिंदुस्थान म्हणतात, ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामुळेच ! सद्यस्थिती पाहिली, तर आज देव, देश आणि धर्म यांवर अनेक संकटे येत आहेत, तरीही हिंदु स्वतःला सुरक्षित समजत आहेत. हिंदु बांधवांनी, हे लक्षात घ्यावे की, आज ते सुपात आहेत. असेच निद्रिस्त राहिलात, तर जात्यात यायला वेळ लागणार नाही. जगाच्या इतिहासात हिंदूंना हिंदू म्हणून जगायचे असेल, तर सिंहासारखे जगायला हवे, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते भोर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. या वेळी २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी आणि धारकरी उपस्थित होते.
क्षणचित्र
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्य गावागावात पोहोचवणारे श्री. धनंजय (आबा) पवार यांची भोर-वेल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात