डोंबिवली : राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे; मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून न रहाता स्थानिक नागरिक, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, बँक आणि कारखाने यांनी पुढाकार घेऊन आपला ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. किल्ल्याची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ अन् निधी या संस्थांनी उपलब्ध करून देण्याचे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने ते आले असतांना त्यांना ‘गड-किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे’, असा प्रश्न विचारला होता. त्या वेळी ते बोलत होते.
कल्याण येथील दुर्गाडी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे. ‘ऐतिहासिक वास्तू आपल्याला जतनही करता येत नाहीत, हे आपले दुर्दैव नव्हे का ? ऐतिहासिक स्थळे चांगली ठेवावीत, हे आपल्या मनातही येत नाही. सौंदर्यावरील आपले प्रेम न्यून झाले आहे’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात