Menu Close

जळगावमध्ये धर्मांधांचे हिंदु तरुणावर आक्रमण !

धर्मांधांची आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या !

dharmandh1जळगाव : येथील काही धर्मांधांनी एका हिंदु तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई घालून त्याचे डोके फोडले. यावरून वाद निर्माण होऊन शनिपेठेत दगडफेक करण्यात आली. पोलिसांची गाडी आणि पोलीस ठाणे यांवरही धर्मांधांच्या जमावाने दगडफेक केली. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच लक्षात येते ! अशा धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी १२ जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१. येथील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात एका टपरीजवळ रणजित चव्हाण आणि त्याचे काही मित्र उभे होते. याच वेळी उद्दाम धर्मांधांनी रणजितला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.

२. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणांना समजावले आणि घायाळ रणजितला जिल्हा रुग्णालयात तातडीने भरती केले.

३. रात्री १० वाजता धर्मांधांनी गुुरुनानकनगर, शनिपेठ परिसरात दगडफेक चालू केल्याचे सांगण्यात आले. तसेच रस्त्यावरील पथदिवेही काही तरुणांनी फोडले. याच वेळी ट्यूबलाईट आणि दगडविटा यांचा सर्रास वापर झाला. (यावरून धर्मांधांच्या दंगली पूर्वनियोजित असतात, हे सिद्ध होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) विद्युत डीपीवर दगड आदळल्याने विद्युतपुरवठा खंडित होऊन अंधार पसरला. (यावरून धर्मांधांची दंगलीची कार्यपद्धत लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. दगडफेक चालू होताच धर्मांधांच्या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी गुरुनानकनगर परिसरातून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

५. रात्री पोलिसांनी घरात घुसून दगडफेक करणार्‍या २० ते २५ जणांना चोप देत कह्यात घेतले; मात्र सकाळी काहींना चौकशी करून सोडून देण्यात आले.

६. आता या परिसरात शांतता निर्माण झाली आहे. शांतता समितीची बैठकही २३ फेब्रुवारी या दिवशी घेण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *