ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : येथे सामाजिक सद्भाव वाढवण्यासाठी जागृती मोहिमेअंतर्गत तहसीलदार नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने गुन्हेगारांचा तपास होऊन त्यांच्याकडून राज्यात झालेली हानीभरपाई वसूल करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) आणि अन्य दोघांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या.
या वेळी सर्वश्री बांधकाम मटेरियल व्यापारी असोशिएशनच्या वतीने खिमजीभाई पटेल, किरीटभाई पटेल, भरतभाई पटेल, भाजीपाला व्यापारी असोशिएशनच्या वतीने अनिल पावणे, दीपक माळी, उत्तम माने, नाभिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष उमेश साळुंखे, बापूसाहेब झेंडे, सराफ असोशिएशनच्या वतीने संजय पोरवाल, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने गजानन पाटील, अशोकराव विरकर, अविनाश जाधव, काकासाहेब लोहार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंत दीक्षित, स्वप्नील माळी, मंदार चव्हाण, सुभाष शिंगण, धर्माभिमानी स्वरूप मोरे, अभिषेक जंगम, राजेश पाटील, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते असे एकूण १२५ कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष
निवेदन देण्यासाठी ह.भ.प. रघुनाथ पाटील (गुरुजी) (वय ८६ वर्षे) हेही उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात