भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे आजपर्यंतचे शासनकर्ते पाक आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदूंचे रक्षण कधी करू शकतील का ? यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चित्तगाँग (बांगलादेश) : येथील बांसखली उपजिल्ह्यातील खणखणाबाद गावात ५ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धर्मांधांच्या जमावाने अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमण करून त्यांना लुटले. या आक्रमणात ८ महिला आणि मुले घायाळ झाली. हिंदूंनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आक्रमण करणार्या १५ पैकी ३ धर्मांधांना कह्यात घेतले आहे.
‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी बांसखली उपजिल्ह्याचे प्रभारी पोलीस महंमद हुसेन यांना संपर्क केला असता पोलिसांनी सांगितले की, सलीम (वय ३५ वर्षे), अब्दुल रहिम (वय १९ वर्षे) आणि रोमोन (वय १५ वर्षे) या तिघांना अटक करण्यात आली असून अन्य आक्रमणकर्त्यांचा शोध चालू आहे. अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी अतिरिक्त पोलिसांची नेमणूक करण्यात येईल. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या कार्यकर्त्यांनी अत्याचारग्रस्त हिंदूंची विचारपूस केली असता पीडित हिंदूंनी सांगितले की, काही धर्मांध बर्याच वेळेला शस्त्रे घेऊन आमच्या घरांमध्ये घुसतात, मौल्यवान साहित्याची लूट करून घरांना आगही लावतात, पोलिसांत तक्रार प्रविष्ट न करण्यासाठीही त्यांच्याकडून धमकावण्यात येते. या प्रकारांमुळे तेथील हिंदूंमध्ये भयाचे वातावरण आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमण करणार्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीरपणे कठोर कारवाई करण्यात यावी. पीडित हिंदूंना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात आणि अल्पसंख्यांक हिंदूंचे अधिकार आणि त्यांची संपत्ती यांना सरकारने संरक्षण द्यावे, अशा मागण्या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने केल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात