‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ संघटनेच्या अहवालातील माहिती
- ही आहे मुसलमानबहुल राष्ट्रांतील अल्पसंख्य हिंदूंची विदारक स्थिती ! याविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मी प्रसारमाध्यमे मीठाची गुळणी धरून बसतील, याची निश्चिती बाळगा !
- हिंदूंनो, बांगलादेश आणि पाकमधील हिंदूंचा आक्रोश केंद्रातील आतापर्यंतच्या एकाही शासनकर्त्यांना कधी ऐकू गेला नाही, हे सत्य जाणा आणि जगभरातील हिंदूंच्या रक्षणार्थ आता तरी हिंदु राष्ट्र (ईश्वरी राज्य) स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !
ढाका – वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३१ जणांचे बलपूर्वक अपहरण करण्यात आले, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. ‘अॅट्रॉसिटीस ऑन रिलिजिअस मायनॉरिटीस इन बांगलादेश फ्रॉम जानेवारी १ ते डिसेंबर ३१, २०१७ ’, या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘बी.जे.एच्.एम्.’चे सरचिटणीस पोलाश कांती दे यांनी ढाका येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी घोषित केली. या वेळी अध्यक्ष प्रभास चंद्र राय उपस्थित होते.
पोलाश कांती दे पुढे म्हणाले, ‘‘७८२ हिंदूंना देश सोडून जाण्यास भाग पाडले गेले, तर २३ जणांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. अनुमाने २५ हिंदु महिला आणि लहान मुली यांच्यावर बलात्कार करण्यात आले. वर्ष २०१७ मध्ये २३५ मंदिरे आणि मूर्ती यांची तोडफोड करण्यात आली. वर्ष २०१७ मध्ये देशात हिंदूंवर ६ सहस्र ४७४ अत्याचारांच्या घटना घडल्या. बांगलादेशमध्ये हिंदूंचे अपहरण करणे, तसेच त्यांची हत्या करणे, यांत वाढ झाली आहे.’’
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात