अन्य धर्मियांच्या बाबतीत अशी चूक झाली असती तर पुरोगाम्यांनी आकाश-पाताळ एक केले असते !
मलेशिया मध्ये हिंदूंच्या संदर्भात झालेल्या ह्या चुकीबद्दल भारतातील पुरोगामी काही तरी बोलतील का ?- संपादक , हिंदुजागृती
क्वालालंपूर : मलेशियामध्ये सरकारदरबारी तब्बल सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नागरिकांना सरकारच्या या प्रकाराविरूद्ध न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
‘हिंदू संगम‘ या संघटनेचे अध्यक्ष मोहन शान यांनी मलेशियातील एका स्थानिक वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली. विविध ठिकाणच्या सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद करण्यात आली आहे. मुस्लिमबहुल मलेशियामध्ये एखाद्या मुस्लिम नसलेल्या नागरिकाची अनावधनाने जरी मुस्लिम म्हणून नोंद झाली तरीही त्या व्यक्तीला माहितीमध्ये बदल करण्यासाठी शरियत न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसा तेथे कायदाही करण्यात आला आहे. मलेशियातील अल्पसंख्यांकांसाठी काम करणाऱ्या आठ स्वयंसेवी संस्था या सात हजार हिंदू नागरिकांच्या मदतीसाठी आल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी ५०० हिंदूंशी संपर्क साधून त्यांना मदत केली आहे. मुस्लिम लॉयर्स असोसिएशननेही यासंदर्भात मदत करण्याचं आश्वासन दिल्यानं हिंदूंना दिलासा मिळाला आहे.
संदर्भ : सकाळ