जिथे महिला पोलिसाचाच विनयभंग करण्याचे धाडस केले जाते, तिथे सामान्य स्त्री सुरक्षित कशी रहाणार ? वासनांधांना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शिक्षा करणारे शासनकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : कोरेगाव भीमा वादाच्या प्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद घोषित केल्यानंतर झालेल्या अनेक घडामोडींमध्ये चेंबूरनाका येथे एका महिला पोलिसाचा आंदोलकांनी विनयभंग केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी १० जानेवारीच्या रात्री १५ आंदोलकांना अटक केली आहे.
चेंबूर परिसरात आंदोलन करून आंदोलकांनी शीव-पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प केला होता. त्या वेळी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करणार्या पोलिसांतील एका महिला पोलीस शिपायाला आंदोलकांनी धक्काबुक्की केली. या महिला पोलीस शिपायाने दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी आंदोलकांवर विनयभंग आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी असे गुन्हे प्रविष्ट केले आहेत. सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. चेंबूरनाका आणि खारदेवनगर येथे आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणीही पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात