मंदिरांसमवेत हिंदूंची असुरक्षित होत असलेली तीर्थक्षेत्रे !
सातारा : १० जानेवारीच्या रात्री श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समाधी मंदिरासमोरील पितळी आणि पंचधातूच्या कासवाची अज्ञातांनीमंदिर मंदिर मोडतोड केली, तसेच अज्ञातांनी पितळी कासवाचे मागील दोन पाय चोरून नेले असून समाधी मंदिरामागील धाब्याच्या मारुतीकडे जाणार्या रस्त्यावरील पथदीप फोडले आहेत. या सर्व प्रकारामुळे श्री समर्थभक्त आणि परळी पंचक्रोशीत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
१० जानेवारीच्या रात्री अज्ञातांनी परिसरातील गटारांचीही तोडफोड केली आहे. २ मासांपूर्वी अंग्लाईदेवी मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या साड्या समोरीलच दक्षिणा ताटावर जाळण्याचा प्रयत्न याच अज्ञातांकडून केला गेला असल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरा पोलीस ठाण्यात झाली. या प्रकरणी लक्ष्मण कुमार मनवे या संशयिताला अटक करण्यात आली.
पोलीस ठाण्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर !
श्रीक्षेत्र सज्जनगड आणि ठोसेघर एकाच मार्गावर असल्याने पर्यटकांची गर्दी असते. याचा अपलाभ घेत काही अज्ञात व्यक्तींकडून युवती आणि महिला यांना त्रास दिला जातो; मात्र लज्जारक्षणास्तव याविषयी अनेक वेळा कुणाकडूनही तक्रार केली जात नाही. पोलीसचौकीची मागणी, पोलीस संरक्षण द्यावे, यांविषयी विविध ठिकाणी पाठपुरावा करूनही यावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे.
घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून यामुळे समस्त समर्थभक्तांच्या भावना दु:खावल्या गेल्या आहेत. ज्या कोणी हा प्रकार केला आहे, त्याच्यावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत; म्हणून प्रशासनानेही योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे, असे मत श्री रामदासस्वामी संस्थानचे अध्यक्ष श्री. भूषण स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात