- मुसलमानधार्जिण्या ममता (बानो) बॅनर्जी सरकारच्या राजवटीत उद्या हिंदूंना सरस्वती पूजनासह हिंदूंचे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! हिंदूंच्या धर्मकार्यात अडथळा निर्माण करणे, हे हिंदुद्वेषी ममता बॅनर्जी यांना वारंवार निवडून देणार्या हिंदूंना शिक्षाच होय !
- ‘ब्राह्मण संमेलनाचे आयोजन करणे, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे, यांद्वारे ममता बॅनर्जी या हिंदु मतपेढी स्वत:कडे वळवू पहात आहेत’, असा करण्यात येणारा दावा किती फोल आहे, हे यावरून लक्षात येईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रायगंज (बंगाल) : उत्तर दिनाजपूर जिल्हा प्राथमिक शाळा परिषदेच्या २ मुसलमान अधिकार्यांनी सरस्वती पूजनानिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणारी सुट्टी यंदा रहित केली. तथापि संतप्त हिंदूंनी सामाजिक संकेतस्थळांवरून याविषयी तीव्र निषेध नोंदवल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी सुट्टी देण्याची घोषणा केली. यंदा २२ जानेवारी २०१८ या दिवशी सरस्वती पूजन होणार आहे. मागील जनगणनेनुसार उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात हिंदूंची लोकसंख्या ४९.३१ टक्के, तर मुसलमानांची लोकसंख्या ४९.९२ टक्के आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष जाहिद आलम आरजू आणि जिल्हा शाळा निरीक्षक तथा कार्यकारी सचिवाचा पदभार असलेले अमिनुल अहसान यांनी शाळांना दरवर्षी देण्यात येणार्या सुट्टयांचे वर्ष २०१८ चे वेळापत्रक १० जानेवारीला घोषित केले. यामध्ये सरस्वती पूजनाच्या दिवशी म्हणजे २२ जानेवारीला सुटी नसल्याचे निदर्शनास आले. यास असंख्य हिंदूंनी सामाजिक संकेतस्थळांवरून प्रचंड विरोध केला. हे बघून प्राथमिक शाळा परिषदेने २२ जानेवारीला सुटीची घोषणा केली. याविषयी सारवासारव करतांना ‘ही कृती नजरचुकीने झाली’ असल्याचे सांगण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात