पेडणे येथील प्रस्तावित कार्निव्हलला विरोध !
पेडणे : १३ फेब्रुवारी या दिवशी मोरजी, पेडणे येथे आयोजित केलेल्या कार्निव्हलला विरोध होत आहे. राष्ट्रप्रेमी नागरिक समिती, पेडणे यांच्या बॅनरखाली विविध संघटनांनी १३ जानेवारी या दिवशी मोरजी भागात पदयात्रा काढून पेडणे तालुक्यात प्रस्तावित कार्निव्हलच्या माध्यमातून पोर्तुगीज संस्कृती हद्दपार करण्याची मागणी केली.
या पदयात्रेला सायंकाळी मोरजी खिंड येथून प्रारंभ झाला, तर पदयात्रेचा मोरजाई देवस्थान येथे समारोप झाला. भारत माता की जय, पोर्तुगिजांच्या कार्निव्हलला हद्दपार करा अशा राष्ट्रप्रेम जागवणार्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये भारत माता की जय, गोवा सुरक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच मोरजी आणि पेडणे येथील राष्ट्रप्रेमी नागरिक आदींनी सहभाग घेतला होता. आंदोलनाचा समारोप करतांना राष्ट्रप्रेमी नागरिक श्री. गजानन मांद्रेकर यांनी आंदोलनाला अनुसरून पुढील पदयात्रांचे नियोजन उपस्थितांना सांगितले.
पदयात्रांचे पुढील नियोजन
पेडणे : शनिवार, २० जानेवारी, सायंकाळी ४.३० वाजता (मार्ग : नानेरवाडा क्रीडामैदान ते पेडणे बाजारपेठ)
मांद्रे : रविवार, २१ जानेवारी, सकाळी ९ वाजता (मार्ग : आस्कावाडा, रवळनाथ मंदिर ते जुनसवाडा, नारोबा देवस्थान)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात