- १ सहस्र ३७५ किलो गोमांस कह्यात
- महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अशा प्रकारची तस्करी केली जाणे, हे राज्यात कायदा नसल्याचेच द्योतक !
यवतमाळ : येथे गोवंशियांची तस्करी करणार्या ७ धर्मांधांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ सहस्र ३७५ किलो गोमांस कह्यात घेण्यात आले आहे. चालक हमजा बीन हसन चाऊस (वय ४० वर्षे), आसीफ अब्दुल कादर कुरेशी (वय ३० वर्षे), अब्दुल समीर अब्दुल आसिफ कुरेशी (वय १९ वर्षे), मो साजिद मो. शमीम कुरेशी (वय २५ वर्षे), जिगर अली वहाब आली (वय १९ वर्षे), रज्जाक गुलाब कुरेशी (वय ३० वर्षे), शेख समीर शेख इर्शाद (वय १९ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. (या धर्मांधांवर गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी, ही गोप्रेमींची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
आर्टीओ कार्यालयाच्या मागे काही जण गोमांसाची तस्करी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकल्यावर त्यांनी पिकअप गाडीतील ११ ड्रममध्ये ठेवलेला २ लाख ७५ सहस्र रुपयांचे गोमांस कह्यात घेतले. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. घटनास्थळावरून गोमांसासह त्यांच्याकडून पिकअप गाडी, एक चारचाकी, २ दुचाकी, ४ भ्रमणभाष असा एकूण ७ लाख ७५ सहस्र रुपयांचा ऐवज कह्यात घेतला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात